देवांग कोष्टी समाज – पुणे
स्थापनेपासूनच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अखंडपणे कार्यरत आहे.
या माध्यमातून पुण्यात समाजासाठी सुंदर मंदिर आणि विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट हॉस्टेल उभारण्यात आले आहे. या हॉस्टेलमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी राहण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे.
दरवर्षी आपण वधू-वर परिचय मेळावा अत्यंत दिमाखात आयोजित करतो, वधुवर परिचय मेळाव्यास महाराष्ट्रातुन, भारतातून आणि परदेशातूनही समाज बांधव येतात ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
मंदिरात दर पौर्णिमेला देवीची महापूजा व महाप्रसाद कार्यक्रम नियमितरित्या आयोजित केला जातो. तसेच समाजाच्या पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दरवर्षी घेतला जातो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे दिली जातात.
याचबरोबर, ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांचा सत्कार, तसेच समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बांधवांचा सन्मान देखील दरवर्षी केला जातो.
समाजातील सर्व बांधव मिळून शाकंभरी पौर्णिमा, नवरात्र उत्सव, होम-हवन, अभिषेक, कुंकुमार्चन विधी, आणि कोजागिरी पौर्णिमा हे सर्व सण मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरे करतात.